Advertisement

महापौर निघाले राणीच्या बागेत, महापौर निवासातून सामान हलवण्यास सुरूवात

दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक साकारण्यात येणार आहे. तर त्यासाठी महापौर निवासस्थान इतरत्र हलवण्यात येणार असून महापौरांचं तात्पुरत स्थलांतर भायखळा येथील राणीच्या बागेत करण्यात करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.

महापौर निघाले राणीच्या बागेत, महापौर निवासातून सामान हलवण्यास सुरूवात
SHARES

दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक साकारण्यात येणार आहे. तर त्यासाठी महापौर निवासस्थान इतरत्र हलवण्यात येणार असून महापौरांचं तात्पुरत स्थलांतर भायखळा येथील राणीच्या बागेत करण्यात करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. तर जानेवारीत महापौर राणीच्या बागेत राहायला जातील असं म्हटलं जात होते.त्याप्रमाणे गुरूवारी महापौर बंगल्यातील सामान हलवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे राणीच्या बागेत राहायला जाणार हे स्पष्ट झालं आहे.


पर्यायी व्यवस्था म्हणून राणीबागेतील बंगला

काही महिन्यांपूर्वी महापौरांच्या निवासस्थानी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक करण्यात याव असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिल्यानंतर महापौरांच्या निवासस्थान हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी महापौरांनी पर्यायी निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील जल अभियंत्यांच्या बंगल्याची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी काही कारणास्तव अमान्य झाल्यानं त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून राणीबागेतील बंगल्याचा पर्याय देण्यात आला होता. नाईलाज म्हणून का होईना महापौरांनी राणीबागेतील बंगल्याच्या प्रस्ताव मान्य केला. दरम्यान महापौरांचं नवं निवासस्थान म्हणून भायखळ्याच्या राणीबागेतील बंगला निश्चित करण्यात आला आहे. आतापर्यंत या बंगल्यात अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड रहात होते. मात्र जऱ्हाड यांनी हा बंगला खाली केला आहे.


बंगल्याचं डागडुजीकरणाचं काम पूर्ण

गेल्या काही दिवसांपासून राणीबागेतील बंगल्याचं डागडुजीचं काम सुरू असून राणीबागेतील हा बंगला एकूण ६ हजार चौ.फूट. क्षेत्रफळाचा आहे. महापौरांच्या आवश्यकतेनुसार या बंगल्याची डागडुजी, रंगरंगोटी, आणि नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. दरम्यान महापौरांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानची सर्व सामान हलवण्याच काम पालिकेतर्फे युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं असून येत्या काही दिवसात महापौर विश्वनाथ महाडेश्वर या ठिकाणी राहण्यास जाणार आहे.



हेही वाचा -

डान्स बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डिल- नवाव मलिक यांचा खळबळजनक आरोप

धारावी पुनर्विकास- कोण मारणार बाजी? अदानी कि सेक्लिंक?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा