coronavirus update: ‘ती’ निघाली अफवा, सरकारी कार्यालय, लोकल ट्रेन सुरूच राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील सर्व सरकारी कार्यालये सुरूच राहणार असून मुंबईतील लोकल ट्रेन (mumbai local train) आणि बस सेवाही कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा- Coronavirus Update: सर्व सरकारी कार्यालये ७ दिवस बंद, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील विविध विभागांची सर्व सरकारी कार्यालये पुढील ७ दिवस म्हणजेच आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची बातमी दुपारपासून प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होती. परंतु ही बातमी अफवा असून असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 

राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना एकूण मनुष्यबळाच्या ५० टक्के क्षमतेनुसार चालवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न कसा सोडवायचा यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोबतच खासगी कंपन्यांना वर्क फ्राॅम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंं त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा- मुंबईतील लोकल, बस बंद करा, पंकजा मुंडे यांची मागणी

मुंबईतील गर्दीने ओसंडून वाहणारी लोकल ट्रेन, मेट्रो आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, तूर्तास तरी या सेवा सुरूच राहणार आहे. आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडू नये, सध्यातरी रस्त्यावरील वाहतूक बऱ्यापैकी कमी झाली आहे. तसंच दुकानदारांनाही अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत गर्दी न ओसरल्यास सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.  

पुढील बातमी
इतर बातम्या