Advertisement

Coronavirus Update: सर्व सरकारी कार्यालये ७ दिवस बंद, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

राज्यभरातील सर्व विभागांची सरकारी कार्यलये (government offices closed) पुढील ७ दिवस म्हणजेच आठवडाभर बंद ठेवण्याचा मोठा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत (state Cabinet meeting) घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.

Coronavirus Update: सर्व सरकारी कार्यालये ७ दिवस बंद, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
SHARES

कोरोना व्हायरचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय अखेर जाहीर केला आहे. राज्यभरातील सर्व विभागांची सरकारी कार्यलये (government offices closed) पुढील ७ दिवस म्हणजेच आठवडाभर बंद ठेवण्याचा मोठा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत (state Cabinet meeting) घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. आठवड्याभरानंतरची परिस्थिती पाहून हा बंद वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. 

दरम्यान मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण पाॅझिटिव्ह (COVID-19) आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा ४० वर गेला आहे. हा रुग्ण अमेरिकेहून मुंबईत आल्याचं समजत आहे.

राज्य सरकारने याआधीच शाळा-काॅलेज बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करताना माॅल, हाॅटेल, लग्न, समारंभात जाऊन गर्दी करू नका असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं होतं. मुंबईत नाहक गर्दी होऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं. तर पुण्यातही संचारबंदी लागू करण्यात आली. शिवाय खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ५० टक्के क्षमतेनुसार काम करण्यासाठी वर्क फ्राॅम होमची मुभा देण्यात आली हाेती. परंतु गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचं लक्षात घेऊन सरकारने सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा विचार सुरू केला. 

सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतच घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी प्रसारमाध्यमांना सकाळी दिली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत लोकल ट्रेन, मेट्रो आणि बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन या सेवा बंद करायच्या की नाही यावर देखील सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

करोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा