सरकारी रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू होणार - डॉ. दीपक सावंत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सरकारी रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील अनेक डॉक्टरांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी मान्यता दिली आहे. याविषयीचा एक प्रस्ताव डॉ. रमाकांत देशपांडे यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सादर केला होता. त्यामुळे या विषयावर बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी आणि तंबाखूच्या व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी येत्या सहा महिन्यांत सरकारतर्फे रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात येतील. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पहिल्यांदाच तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे तंबाखूचे व्यसन जडलेल्या व्यक्तीला तंबाखू सोडण्यासाठी मदत होईल.

- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री


हेही वाचा

जे.जे मध्ये रुग्णांचे नातेवाईक करतात कर्मचाऱ्यांचं काम?

झिका पसरतोय, काळजी घ्या...


पुढील बातमी
इतर बातम्या