मुंबईसह 11 जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार कोसळणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील आठवडाभरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील (maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या विनाशकारी पावसामुळे राज्यातील बळीराजा (farmers) संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतातील पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत असताना राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात येत्या शुक्रवारपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. कमी दाबाच्या पोषक वातावरणामुळे मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरही सोमवारपर्यंत पाऊस पडणार आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. तसंच परवा शनिवारी राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच शनिवारी मुंबई (mumbai), ठाणे (thane), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथ्याचा परिसर, कोल्हापूर घाटमाथ्याचा परिसर, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

यामुळे येत्या शनिवारी मुंबईसह उपनगरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मुंबईत नवरात्रौत्सव गरबा खेळून मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना पावसामुळे मुंबईकरांच्या सणावर पाणी पडणार आहे.


हेही वाचा

सुधारित भाडे लागू न केल्यास कॅब कंपन्यांचे परवाने रद्द

एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरून प्रवास करता येणार

पुढील बातमी
इतर बातम्या