Advertisement

एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरून प्रवास करता येणार

तिकीट कुठे बुक कराल? दर स्वस्त होणार? जाणून घ्या

एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरून प्रवास करता येणार
SHARES

आता, मुंबईकर वनटिकेट अॅप वापरून सध्या सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गांसाठी तिकिटे बुक करू शकतात. हे अॅप प्रवाशांना एकाच वेळी वेगवेगळ्या मेट्रो मार्गांसाठी तिकिटे खरेदी करण्याची परवानगी देते, ज्यामुळे प्रवास सोपा आणि स्मार्ट होतो.

सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये चार मेट्रो मार्गिका सुरू आहेत. आता एकाच तिकिटावरुन चारही मेट्रो मार्गिकांवरुन प्रवास करता येणार आहे.  

मुंबई मेट्रो वनच्या मते, जून 2025 मध्ये मेट्रो लाईन 3 साठी पायलट म्हणून लाँच केलेल्या या अ‍ॅपला जोरदार सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीचा विकास झाला.

मुंबई आणि उपनगरातील मेट्रो मार्गिका (one ticket for four metro lines)

1 घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1 

2 दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ

3 दहिसर-गुंदवली मेट्रो 7 

4 आरे-आचार्य अत्रे चौक 

सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये वरील चार मेट्रोच्या मार्गिका सुरू आहेत. या मार्गिकांवरुन प्रवास करताना प्रवाशांना तिकीट सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत यासाठी एमएमओसीएलने स्वीक्वेलस्ट्रगिं कंपनी आणि एमएसओसीएलने वन तिकीट अ‍ॅप सुरू केलं आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल या नेटवर्कवर हे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. 

प्रवासी प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. विशेष म्हणजे विविध मार्गिकांनुसार वेगवेगळे विभाग करण्यात आलेले नाही. याचा अर्थ दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावरुन तु्म्हाला वरळीपर्यंत प्रवास करायचा असेल तर तीन मार्गिकांसाठीच्या तीन तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. तुम्ही या अॅपवर रूट निवडणून तिकीट बुक करू शकता. जर तुम्ही दहिसर पूर्व मेट्रो ते वरळी मेट्रो अशी स्थानकं बुक केली तर याचं तिकीट १०० रुपये होतील. हे पैसे तु्म्ही कार्ड, नेटबँकिंग, UPI च्या माध्यमातून देऊ शकता.  

दहिसर (पूर्व) - गुंदवली - 30 रुपये तिकीट

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - मरोळ नाका - 20 तिकीट

मरोळ नाका - वरळी - 50 रुपये तिकीट 

या तिन्ही मार्गिकांचं तिकीट एकाच वेळी वन अ‍ॅप या अ‍ॅपवरून काढता येईल. एकाच वेळी तिकीट काढता येणार असले तरी तिकीट दरात अद्याप तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन मार्गिगांचे तिकीट एकत्र काढले तरी कोणतीही सवलत मिळणार नाही. 



हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा