मराठवाड्यातील (marathwada) महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी अनेक मदतीचे (help) हात शेतकऱ्यांसाठी सरसावले आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना भेट देत 721 कोटी 97 लाख 86 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने (Education department) स्वतःच्या पुढाकाराने या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. यात शिक्षण मंत्री, शिक्षण राज्य मंत्री, प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांनी आपला एक महिन्याचा पगार दिला आहे.
तसेच, सर्व शिक्षक संघटनांनी मिळून 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे
तसेच शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील (
maharashtra) लोकप्रिय गणेश मंडळ असलेल्या 'लालबागचा राजा (lalbaugcha raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे.
'कोकण एनजीओ इंडीया' ही मुंबईतील (mumbai) NGO आहे आणि त्यांनी मराठवाडा पूरग्रस्तांसाठी “Donate for Marathwada Flood Relief” उपक्रम सुरु केला आहे.
'मराठा फाउंडेशन' ही संस्था “Relief Aid” कार्यक्रमांमध्ये काम करते आणि त्यांनी “Donate Now” पेज उपलब्ध करून सर्वांना मदत कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्यांचं (farmers) नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी आशा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.