गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात तरुणाला बेदम मारहाण

पोलिस आरोपिंचा शोध घेत आहेत.

गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात तरुणाला बेदम मारहाण
SHARES

मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्कोमध्ये झालेल्या नवरात्री दांडिया महोत्सवात मारहाणीची घटना घडलीय. एका 19 वर्षीय जेनिल बारबया नावाच्या तरुणाला काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जेनिल बारबयच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. त्याला मालाड (पश्चिम) येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत पोलिसांनी तिघा तरुणांना ताब्यात घेतले होते. मात्र उपलब्ध माहितीनुसार हे आरोपी पोलिसांच्या व्हॅनमधून पसार झालेत.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को येथे पावसामुळे मोठी गर्दी झाली होती. दांडिया खेळताना एका तरुणाने जेनिलला धक्का दिला. त्यावर प्रश्न विचारल्यामुळे भांडण उफाळले आणि जमावाने त्याला मारहाण केली असं सांगण्यत येत आहे.

गोरेगावमधील वनराई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. विशेष म्हणजे मारहाण करणारे काहीजण पोलीस व्हॅनमधून पसार झालेत.

वनराई पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जेनिल गरबा खेळत असताना त्याचा हात चुकून दुसऱ्या सहभागीवर लागला. या प्रकरणावरून एका गटाने त्याला मारहाण केली. तथापि, जेनिलची प्रकृती स्थिर आहे आणि हे प्रकरण किरकोळ भांडण असल्याचे दिसून येते. मी त्याच्या वडिलांशीही या घटनेबद्दल आणि प्रकरणाची चौकशी करण्याबद्दल बोललो आहे."




हेही वाचा

मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा