मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन कॉल नेमका कुठून आला आणि कोणी केला याबाबत तपास सुरू आहे.

मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर
SHARES

मुंबईत (mumbai) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. मुंबईजवळील समुद्रात बॉम्बस्फोटाची ( धमकी (threat) देत एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आहे.

नवी मुंबईतील (navi mumbai) महापे येथील आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर याबाबतचा फोन आला. त्यानंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

धमकीचा फोन कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासासह सखोल तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला हे शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही माहिती खरी नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथक (ATA) देखील या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आहेत आणि सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. नौदलालाही याची माहिती देण्यात आली आहे.



हेही वाचा

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी केली चर्चा

Amazon आता 10 मिनिटांत डिलिव्हरी करणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा