गणरायासाठी विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. बाप्पांच्या विसर्जनाला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी हिंदुजा कॉलेजच्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. गणेश विसर्जनादरम्यान निर्माण होणारा कचरा आणि त्यामुळे अस्वच्छ झालेली किनारपट्टी स्वच्छ करण्याचा ध्यासच या मुलांनी घेतला आहे.

गेले दोन दिवस हे विद्यार्थी गिरगाव चौपाटी स्वच्छ करत आहेत. जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना हातमोजे आणि स्वच्छतेचे साहित्य पुरवण्यात आले होते. 'सेव्ह द नेचर' हे या विद्यार्थ्यांचे बोधवाक्य होते आणि या बोधवाक्याला साजेसे असे काम या विद्यार्थ्यांनी केले. दरम्यान या विद्यार्थ्यांनी किनाऱ्यावर येणाऱ्यांना पुढील वर्षीपासून तरी इको फ्रेंडली बाप्पा बसवा असे आवाहन केले.

या समाजिक उपक्रमातून आम्ही खूप काही शिकलो. एकजुटीने काम करणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. त्याचप्रमाणे ज्या बाप्पाने आपल्याला घडवले, त्या बाप्पाला अशा अवस्थेत बघणे फार त्रास देऊन गेले. या कार्यक्रमातून आम्ही 'इको फ्रेंडली फेस्टिव्हल साजरा करा' असा संदेश दिला आहे.

केवल परमार, विद्यार्थी, हिंदुजा कॉलेज


हेही वाचा -

चतुर्दशीला विघ्नहर्त्याच्या भूमिकेत मुंबई पोलीस!

हा कचरा कोण साफ करणार?

पुढील बातमी
इतर बातम्या