विद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाविद्यालये पुन्हा सुरू होण्यासाठी सज्ज आहेत. पण यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे आता कॉलेजेस लसीकरणावर अधिक भर देत आहेत.

कमीतकमी धोका (संसर्गाच्या बाबतीत) आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, रोटरॅक्ट क्लब आणि HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या NSS युनिटनं, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी उचलण्याचं ठरवलं आहे.

हा निर्णय २१ जानेवारी २०२२ रोजी हाती घेण्यात आला, याद्वारे लसीकरण न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाचा १०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला.

HNNC विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हेमलता बागला म्हणाल्या की, “कोविडमुक्त भारताकडे वाटचाल करण्याचा हा प्रयत्न होता!”

यासाठी एच.आर. कॉलेजनं महाविद्यालयाच्या आवारात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्यानं लसीकरण केले. ३ जानेवारी रोजी सरकारनं १५-१७ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण पुन्हा सुरू केली. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली.


हेही वाचा

Covishield, Covaxin लसी खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या