Advertisement

Covishield, Covaxin लसी खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) Covishield आणि Covaxin या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.

Covishield, Covaxin लसी खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी
SHARES

देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. Covishield आणि Covaxin या लसी लवकरच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) Covishield आणि Covaxin या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.

आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत २७५ रुपये असणार आहे. तसंच यावर सर्व्हिस चार्ज १५० रुपये इतका लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोवॅक्सीनची सध्या खुल्या बाजारात १२०० रूपये किंमत आहे. तर कोविशील्डचा एक डोस ७८० रुपये आहे. दोन्ही लसींवर १५० रुपये सर्व्हिस चार्ज आहे. सध्या देशात दोन्ही डोस आप्तकालीन वापरासाठी उपलब्ध आहेत.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं Covishield आणि Covaxin या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानं आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागेल. परवानगी नंतर Covishield आणि Covaxin या लस रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.

खुल्या बाजारात विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ज्यांना लस घ्यायची आहे, ते मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊ शकता, अन् डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतात. लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर देशातील लसीकरणाला आणखी वेग येईल. तसंच सरकारवरील भारही कमी होईल. लसीची किंमत ठरल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.



हेही वाचा

मुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटचे - BMC

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा