
मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्यामध्ये घट होत आहे. मुंबईतील कोरोनाची लाट ओसरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली तरी ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.
कस्तुरबा प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालानुसार मुंबईतील दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी ८८ टक्के रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटचे आहेत. तर फक्त १० टक्के रुग्ण डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे आढळले आहेत.
तज्ज्ञांकडून ओमिक्रॉनच्या समुह संसर्गाबाबत चर्चा झाली आहे. कस्तुरबा प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल समोर आला आहे. ३६३ रुग्णांच्या नमुन्यांपैकी ३२० जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. तर ३ जणांना डेल्टा आणि ३० जणांना डेल्टाच्या उपप्रकरांची लागण झाल्याचं आढळलं.
याव्यतिरिक्त १० रुग्णांना कोरोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं डेल्टाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचं आढळलं आहे. म्हणजे, ओमिक्रॉनच्या रुग्णाची संख्या जास्त आहे. पण ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्याचं आणि मृताचं प्रमाण खूपच कमी आहे.
हेही वाचा
