मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेसच्या अप आणि डाऊन मार्गावरील फेऱ्या रद्द (cancelled) होणार आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण रेल्वेमार्गावर गाड्या धावणार आहेत.

या कालावधीत गाड्यांचा वेग मंदावतो तसेच काही गाड्यांच्या अप आणि डाऊन वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका सुपरफास्ट गाड्यांना होतो. त्यामुळे या पावसाळी वेळापत्रकाचा फटका वंदे भारत एक्सप्रेसलाही बसला आहे.

आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (vande bharat express) आता फक्त तीन वेळा धावणार आहे. कोकण रेल्वेवर (konkan railway) गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. तसेच पावसाळ्यात कोकणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसचा पर्याय निवडतात.

पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई ते गोवा हे 586 किमीचे अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसला 8 ते 10 तास लागतात. पावसाळी वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 22229 सीएसएमटी (csmt)-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5.25 वाजता सीएसएमटीहून सुटते आणि मडगाव येथे दुपारी 3.30 वाजता पोहोचते.

तसेच परतीच्या वेळेस गाडी क्रमांक 22230 मडगाववरून दर मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुटते आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला (mumbai) पोहोचते. 


हेही वाचा

एसटी महामंडळाकडून पाच नवीन प्रादेशिक विभागांची स्थापना

अंतिम मुदतीपूर्वी फक्त 48 बेकरीतच सूचनांचे पालन

पुढील बातमी
इतर बातम्या