मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. India Meteorological Department (IMD) ने मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. सोमवार आणि मंगळवारी काही भागांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) जाणवू शकते. तसेच पालघर आणि रत्नागिरीसाठी सोमवारचा इशारा देण्यात आला आहे.
8 आणि 9 मार्चलाही IMD ने उष्णतेचा इशारा दिला होता. 10 मार्च रोजी मुंबईत गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मार्चमधील तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी सांताक्रूझ येथे 36.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून मंगळवारी ते 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असताना, राज्यातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव येथे मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
काय करावे
काय करू नये
हेही वाचा