वांद्रे परिसरातील २५० अनधिकृत झोपड्या पालिकेने तोडल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान महापालिकेच्या दैनंदिन कारवाईला मर्यादा येतात. ही बाब हेरून या कालावधीचा गैरफायदा घेत काही लोकांनी वांद्रे पश्चिम परिसरातील कुरेशी नगरमध्ये सुमारे २५० झोपड्या उभारल्या होत्या. याच परिसरात ९ नोव्हेंबर २०१८ रोजी लागलेली आग विझवण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना याच झोपड्यांमुळं अडथळा आला होता. ही बाब लक्षात घेत पालिका व पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्यानं एच पश्चिम विभागाद्वारे मंगळवारी झोपड्या हटवण्याची धडक कारवाई करण्यात आली. 

९० कर्मचारी सहभागी

स्वामी विवेकानंद मार्गालगत असणाऱ्या कुरेशी नगरमधील म्हाडाच्या सुमारे ३५ हजार चौरस फूट आकाराच्या भूखंडावर दिवाळीदरम्यान २५० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या.  पालिकेच्या एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. यानुसार मंगळवारी या २५० झोपड्या तोडण्यात आल्या.  या कारवाईत २० पोलिस कर्मचारी, पालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी मिळून ९० जण सहभागी होते. या कारवाईसाठी २ जेसीबी, १ डंपर  १ ट्रक इत्यादी साधनसाम्रगी वापरण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. 


हेही वाचा - 

स्वा. सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधींविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार

तोतया सीबीआय अधिकारी गजाआड


पुढील बातमी
इतर बातम्या