भिक्षागृहांमधील भिक्षुकांच्या मानधनात वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारच्या भिक्षागृहात (almshouses) निवारा दिला जातो. तसेच अशा भिक्षुकांना (mendicants monk) कामाचा मोबदला दिला जातो. 

मात्र आता या भिक्षुकांच्या मानधनात (honorarium) वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुरुष व महिला भिक्षागृहांमध्ये राहणाऱ्या 368 भिक्षुकांना आता दररोज 5 रुपयांच्या ऐवजी 40 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या भिक्षुकांच्या मोबदल्यात आठ पटीने वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा वाढीव मोबदला देण्यास सुरुवात होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने यासाठी महाराष्ट्र (mahrashtra) भिक्षा प्रतिबंध (संशोधन) अधिनियम-1964 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार भिक्षागृहांमध्ये राहणाऱ्या भिक्षुकांकडून समाधानकारक प्रगती आणि चांगल्या वर्तणुकीच्या आधारे प्रशिक्षणादरम्यान त्यांना दररोज 40 रुपये मेहनताना देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य (maharashtra) मंत्रिमंडळाने एप्रिल 2025 मध्ये या वाढीव मानधनाला मंजुरी दिली. मात्र अद्याप हे वाढीव मानधन देण्यात आलेले नाही. राज्यातील 14 शासकीय भिक्षागृहांमध्ये सध्या 368 भिक्षुक आहेत.


हेही वाचा

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ग्रंथालयावर हातोडा?

महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या