रेल्वे भरतीची वयोमर्यादा २८ वरून ३० वर्ष

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनेक ठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर अखेर रेल्वेने चतुर्थ श्रेणी पदांसाठी भरतीची वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३० वर्ष केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत २८ वर्षे वयापर्यंतच या परीक्षेला बसता येत होते. आता मात्र ३० वर्ष वयापर्यंत ही परीक्षा देता येणार आहे. याशिवाय स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इतर प्रवर्गांसाठीही वयोमर्यादेत बदल

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी पदांसाठीच्या परीक्षांसाठीची वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३० वर्ष करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी लागू असेल. याशिवाय ओबीसीसाठी वयोमर्यादा ३१वरून ३३ तर एससी आणि एसटी प्रवर्गांसाठीची वयोमर्यादा ३३वरून ३५ वर्षे करण्यात आली आहे.

पायलटच्या पदांसाठीही नियमांत बदल

याशिवाय लोको पायलट आणि सहायक लोको पायलट या पदांसाठीच्या वयोमर्यादेमध्येही वाढ करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २८ वर्षांपर्यंतच ही परीक्षा देता येत होती. आता मात्र ही वयोमर्यादा ३० वर्षे करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त ओबीसी वर्गासाठीची वयोमर्यादा ३१ वरून ३३, तर एससी आणि एसटीसाठीची वयोमर्यादा ३३ वरून ३५ वर्षे करण्यात आली आहे.

मुंबई झोनमध्ये ४६२५ जागा

देशभरात एकूण ९० हजार जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात मुंबई झोनमधल्या ४ हजार ६२५ जागांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी जानेवारी महिन्यात जाहिरात काढण्यात आली होती. तसेच, १२ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.


हेही वाचा

रेल्वेनं काढली ८९ हजार जागांची जम्बो भरती!

पुढील बातमी
इतर बातम्या