Advertisement

नोकऱ्यांपुढील 'मेगाब्लाॅक' दूर, रेल्वेनं काढली ८९ हजार जागांची जम्बो भरती


नोकऱ्यांपुढील 'मेगाब्लाॅक' दूर, रेल्वेनं काढली ८९ हजार जागांची जम्बो भरती
SHARES

रेल्वेत काम करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण रेल्वेने मंत्रालयाने जगातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत देशभरात तब्बल ८९,४०९ जागा, तर महाराष्ट्रात ४ हजार ६२५ जागा भरण्यात येणार आहेत.


अर्ज प्रक्रिया सुरू

लोको पायलट आणि टेक्निशियनसह इतर पदांसाठी ८९,४०९ जागा देशभरात भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी शिक्षणाची अट दहावी, आयटीआय उत्तीर्ण, अभियांत्रिकी डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवी अशी आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 'क' गटातील 'प्रथम श्रेणी 'आणि 'द्वितीय श्रेणी'च्या ८९ हजार ४०९ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेपैकी एक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.



'या' संकेतस्थळावर पाठवा अर्ज

(www.indianrailways.gov.in ) या रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज पाठवता येतील. 'क' गटातील 'प्रथम श्रेणी' च्या जागेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ५ मार्च, तर द्वितीय श्रेणीसाठी १२ मार्च अशी आहे.


कुठली पदं?

'क 'गटातील 'प्रथम श्रेणी'त ट्रॅक मेंटेनर, पॉईंट मॅन, हेल्पर आणि गेटमन अशा जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि यासाठी वयोमर्यादा १८ ते ३१ वर्षे आहे. 'सी' गटातील 'द्वितीय श्रेणी' त टेक्निशियन म्हणजेच फिटर, क्रेन ड्रायव्हर अशा विविध पदांचा समावेश आहे. द्वितीय श्रेणीच्या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.


परीक्षा कधी?

तसंच, सातव्या वेतन आयोगानुसार, 'क' गटातील द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्याला मासिक वेतन १९ हजार ९०० रुपये ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत असेल. तर 'क' गटातील प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये ते ५६ हजार ९०० रुपयांपर्यंत वेतन आहे. एप्रिल आणि मे २०१८ पर्यंत या जागांसाठी परीक्षा घेण्याची तयारी रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा