खूशखबर! रेल्वे अवघ्या ४९ पैशांत प्रवाशांना देणार १० लाखांचा विमा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण, प्रवाशांना आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) अवघ्या ४९ पैशात १० लाखांचा विमा देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यास हा विमा मिळणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांचे तिकीट आरसी अथवा कन्फर्म असेल त्यांनाच या विम्याचा लाभ मिळणार आहे.

फक्त ४९ पैशांत विमा

आयआरसीटीसीकडून याआधी प्रवाशांना ही सेवा मोफत दिली जात होती. मात्र, या सेवेसाठी आता ४९ पैसे प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करताना प्रवाशांना हा पर्याय दिसणार आहे. रेल्वे प्रवाशांना विमा घ्यायचा असेल, तर आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर प्रवाशांना नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागणार असून, अधिकृत माहिती भरल्यावर याबाबत माहिती एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना मिळणार आहे. 

१० लाखांचा विमा

रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्या दुर्घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना १० लाखांचा विमा मिळणार आहे. त्याचप्रमाणं, अर्ध अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. तसंच, रुग्णालयामधील उपचारांसाठी अतिरिक्त २ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. 


हेही वाचा -

Exclusive आयपीएलवर दहशतवादाचे सावट ?

मुंबईत महिलांसाठी केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालयं


पुढील बातमी
इतर बातम्या