Advertisement

मुंबईत महिलांसाठी केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालयं

पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी मुंबईत केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालय असल्याची माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातून समोर आली आहे.

मुंबईत महिलांसाठी केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालयं
SHARES

मुंबईतील विविध कंपन्या, कार्यालयांमध्ये पुरूषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. विरार, ठाणे, नवी मुंबईतून असंख्य महिला दररोज मुंबई शहरात कामानिमित्त येतात. घराबाहेर पडणाऱ्या पुरूषांसाठी शहरात ठिक-ठिकाणी सार्वजनिक शौचालयं आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी मुंबईत केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालय असल्याची माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातून समोर आली आहे. 


३,२३७ शौचालये उपलब्ध

मुंबईत महिलांसाठी एकूण ३२३७ शौचालये उपलब्ध असून, पुरुषांच्या शौचालयांची संख्या महिलांच्या शौचालयांच्या तिप्पट म्हणजेच ९६४६ एवढी आहे. मुंबई शहर भागात पुरुषांसाठी ४७६२, पश्चिम उपनगरांमध्ये २६६७ आणि पूर्व उपनगरांत २२१७ शौचालयं उपलब्ध आहेत. तर मुंबईत महिलांसाठी १४९९, पश्चिम उपनगरांमध्ये ९४१ आणि पूर्व उपनगरांमध्ये ७९७ सार्वजनिक शौचालयं आहेत. 


सर्वाधिक तफावत शहरांत

पुरुष आणि महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शौचालयांच्या संख्येमध्ये जवळपास ६६ टक्क्यांची तफावत आहे. सर्वाधिक तफावत ही मुंबई शहर भागात आहे. मुंबईतील चर्चगेट, नरिमन पॉईंट, कुलाबा या भागात पुरुष आणि महिलांच्या शौचालयांच्या संख्येत ७७ टक्के तफावत आहे. तसंच, चिराबाजार, भुलेश्वर भागात ८५ टक्के तफावत असल्याचं ‘प्रजा’च्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.



हेही वाचा -

घाटकोपर स्थानकातील २ पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

जेट एअरवेजच्या प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयनं रोखली उड्डाणं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा