जेट एअरवेजच्या प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयनं रोखली उड्डाणं

डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सनं (डीजीसीआय) जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं रोखल्याने गुरुवार रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.

SHARE

डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सनं (डीजीसीआयजेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं  रोखल्याने गुरुवार रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. याबाबत प्रवाशांनी चौकशी केली असता जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.


आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प

जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक समस्यांमध्ये अडकली आहे. त्यामुळं डीजीसीआयनं तांत्रिक मुद्द्यांवरुन जेटच्या विमान उड्डाणाला परवानगी नाकारली. परिणामी गुरुवार रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली.


वेतन देण्याची मागणी

आर्थिक समस्यांमध्ये अडकल्यानं जेट एअरवेज कंपनीला पायलट्ससोबत इंजीनियर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतन देणं कठीण झालं आहे. मागील ३ महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं १४ एप्रिलपर्यंत पायलट्सचं वेतन देण्याची मागणी जेट एअरवेजची पायलट्स असोसिएशन 'नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड'नं (एनएजी) नोटीसद्वारे केली आहे.हेही वाचा -

हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू

मुंबईचे डबेवाले जाणार ६ दिवस सुट्टीवर!
संबंधित विषय