Advertisement

मुंबईचे डबेवाले जाणार ६ दिवस सुट्टीवर!

येत्या १५ एप्रिलपासून मुंबईचे डबेवाले ६ दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळं डबेवाल्यांकडूव डब्बे घेणाऱ्या मुंबईकरांनी आपल्या जेवणाची सोय करून घ्यावी असं आवाहन मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.

मुंबईचे डबेवाले जाणार ६ दिवस सुट्टीवर!
SHARES

मुंबईचे डबेवाले मुंबईत दररोज लाखो लोकांना वेळेत डबे पोहोचवतात. एक दिवस जरी ही सेवा बंद झाली तर मुंबईकर नोकरदारांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, येत्या १५ एप्रिलपासून मुंबईचे डबेवाले ६ दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळं डबेवाल्यांकडूव डबे घेणाऱ्या मुंबईकरांनी आपल्या जेवणाची सोय करून घ्यावी, असं आवाहन मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.


६ दिवस सेवा बंद

मुंबईचे बहुतांश डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे तसंच अकोला, संगमनेर जिल्हा अहमदनगर या भागातील आहेत. सध्या या जिल्ह्यांमध्ये यात्रेचे दिवस सुरू आहेत. यात्रेसाठी मुंबईतील डबेवाले गावी जात असल्याने डबेवाल्यांनी सोमवार १५ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ६ दिवसांच्या सुट्टीत महावीर जयंती व गुडफ्रायडे या २ सरकारी सुट्ट्या देखील आहेत. या ६ सुट्ट्यांमधून २ सुट्ट्या वगळल्या, तर खऱ्या अर्थानं डबेवाले फक्त ४ दिवस सुट्टी घेणार आहेत, असं सुभाष तळेकर यांनी सांगितलं.


पगार न कापण्याची मागणी

६ दिवसांच्या सुट्टीनंतर २२ एप्रिलपासून डबेवाले पुन्हा सकाळी आपल्या ठराविक वेळेत कामवार हजर राहणार आहेत. उन्हाळी सुट्टीनिमित्तानं बहुतांश शाळा, कॉलेज, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळं डबेवाल्यांची सेवा काही प्रमाणात बंद आहे. मात्र, डबेवाले सुट्टीवर गेल्यानं काही लोकांची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल डबेवाले असोसिएसनकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्राहकांनी डबेवाल्यांच्या ६ दिवसांच्या सुट्टीचा पगार कापू नये, अशी मागणी देखील मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. 



हेही वाचा -

न्या. अभय ओक यांच्या नावाची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस

मुंबईतील ६ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा