Advertisement

न्या. अभय ओक यांच्या नावाची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस

मागील १५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले आणि महत्त्वाच्या प्रकरणांत ऐतिहासिक निकाल देणारे न्या. अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्या. अभय ओक यांच्या नावाची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस
SHARES

मागील १५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले आणि महत्त्वाच्या प्रकरणांत ऐतिहासिक निकाल देणारे न्या. अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं अभय ओक यांची नेमणूक कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार, राष्ट्रपतींच्या संमतीनं केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ज्येष्ठ न्यायमूर्ती

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांना बढती देऊन सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचं पद रिक्त झालं होतं. हे पद रिक्त असल्यानं न्या. अभय ओक यांची नेमणूक कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अभय ओक हे मुंबई उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत आणि सर्व आवश्यक निकष लक्षात घेता ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होण्यास योग्य असल्यानं त्यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे', असं सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं शिफारसपत्रात म्हटलं आहे.


महत्त्वाचे निकाल

राज्यातील बेकायदा बांधकामे, होर्डिंगबाजी, ध्वनिप्रदूषण व उत्सवांतील बेकायदा मंडपे, मराठवाडा पाणी प्रश्न, मुंबईतील तानसा जलवाहिनीलगतच्या बेकायदा झोपड्यांवरील कारवाई आणि झोपडीवासीयांचं माहुलमधील पुनर्वसन, मुंबईतील बेकायदा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न व नव्या बांधकामांवरील बंदी अशा प्रकरणांत न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठांने महत्त्वाचे निकाल व आदेश दिले आहेत. 



हेही वाचा -

शरद पवार, उर्मिला मातोंडकर यांच्यात अर्धा तास गुफ्तगू

झी वाहिनीचं प्रसारण २ तास बंद, निवडणूक आयोगाची कारवाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा