काँग्रेसची उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सध्या प्रचाराचा धडाका लावला आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांशी भेटीगाठी घेण्यासोबत त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी ती हरतऱ्हेचे फंडे आजमावत आहे. त्यातच गुरूवारी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
उर्मिला मातोंडकर हीनं शरद पवार यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. पंरतु त्यांच्या भेटीमागचं कारणं मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यातच गुरूवारपासून पहिल्या टप्प्याच्या मतदानालाही सुरूवात झाली आहे. त्यामुळं लोकसभा निवडणूक आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं आहे.
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून तिच्या समोर भाजपाच्या दिग्गज गोपाळ शेट्टींचं आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा पराभव केला होता.
हेही वाचा -
करून दाखवलं! शिवसेनेच्या नव्या लोगोतून 'भगवा' गायब
जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपसातच भिडले