करून दाखवलं! शिवसेनेच्या नव्या लोगोतून 'भगवा' गायब

भगवा रंग हा अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख होती. परंतु शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शिवसेनेकडून नवा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या नव्या लोगोमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या मागे असलेला भगवा रंग काढण्यात आला आहे.

SHARE

भगवा रंग हा अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख होती. परंतु शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शिवसेनेकडून नवा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या नव्या लोगोमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या मागे असलेला भगवा रंग काढण्यात आला आहे. बुधवारीच हा नवा फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला होता. ऐन निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेनं असा बदल केल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


शिवसैनिकांकडून नाराजी

ऐन निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेकडून लोगोचा रंग बदलण्यात आला आहे. यातून भगवा रंग गायब झाल्यानं शिवसैनिकांनी आणि नेटीझन्सनं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या लोगोमागे असलेला भगवा रंग हा शिवसेनेची ओळख बनली होती. यापूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा रंग काळा तर त्यामागे भगवा रंग असा त्यांचा लोगो होता. परंतु आता धनुष्यबाणाचा रंग काळा आता त्याच्या पाठीमागं पांढरा रंग ठेवण्यात आला आहे. 


बदलाचं कारण काय?

त्यातच शिवसेनेची ओळख असलेला भगवा रंग अचानक गायब करण्यात आल्यानं शिवसैनिक आणि नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत भगवा रंग का काढण्यात आला? असा सवाल केला आहे. तसंच आता या बदलाचं कारण काय? असा प्रश्न देखील विचारला आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमधील प्रचारादरम्यान एका उमेदवारानं केलेल्या जाहिरातीत भाजपाच्या कमळाचा रंगही पांढरा करण्यात आला होता. एवढंच नाही, तर कमळाच्या बॅकग्राऊंडला हिरवा रंग दाखवण्यात आला होता. सध्या अनेक व्यासपीठांवर किंवा खिशावर लावलेल्या कमळाचा रंग हा पांढराच असतो. 
हेही वाचा -

राधाकृष्ण विखेंचं सुजयच्या पावलावर पाऊल; हाती घेणार ‘कमळ’

महाराष्ट्र द्वेषी निरूपमांचा प्रचार करणार नाही; मनसेची भूमिकासंबंधित विषय
ताज्या बातम्या