Advertisement

महाराष्ट्र द्वेषी निरूपमांचा प्रचार करणार नाही; मनसेची भूमिका

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजय निरूपम यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टीकरण मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे. संजय निरूपम यांनी मराठीच्या द्वेष आणि महाराष्ट्राविरोधात भूमिका घेतल्याचं सांगत त्यांचा प्रचार मनसे करणार नसल्याचं नांदगावकर म्हणाले.

महाराष्ट्र द्वेषी निरूपमांचा प्रचार करणार नाही; मनसेची भूमिका
SHARES

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजय निरूपम यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टीकरण मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे. संजय निरूपम यांनी मराठीच्या द्वेष आणि महाराष्ट्राविरोधात भूमिका घेतल्याचं सांगत त्यांचा प्रचार मनसे करणार नसल्याचं नांदगावकर म्हणाले. काही दिवसांपासून मनसे निरूपम यांचा प्रचार करणार का? असा सवाल केला जात होता. त्यावर आता मनसेकडूनही उत्तर देण्यात आलं आहे.


निरूपम-मनसे वाद

संजय निरूपम आणि मनसेत यापूर्वी अनेकदा उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून खटके उडाल्याचं पहायला मिळालं होतं. तसंच संजय निरूपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या एका वक्तव्यानंतर मनसैनिकांच्या रोषालाही त्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर मनसैनिकांनी निरूपम यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

यावर्षी मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी मोदी शाह यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानं मनसे चर्चेत राहिली आहे. तसंच भजपाला मतदान करू नका असं आवाहन करू नका, असं सांगत राज्यभरात १० सभा घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच आपल्या सभांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फायदा झाला तरी चालेल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.


सोशल मीडियावर संदेश

राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर निरूपम यांच्याविरोधात ते काय भूमिका घेतील, असा सवाल करणारे संदेश पाठवण्यात येत होते. त्यानंतर आता बाळा नांदगावकर यांनी या चर्चेला पूर्णविराम देत निरूपम यांना मनसे कोणत्याही प्रकारची मदत करणार नसून त्यांच्यासाठी प्रचार न करणं ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. तसंच अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

'पीएम मोदी' सिनेमाला मिळालं U सर्टिफिकेट, मात्र निवडणूक आयोगाकडून रिलिजला स्थगिती

मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा