मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणात

गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. तर मुंबईसाठी २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ९ एप्रिल मुंबईच्या लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती.

SHARE

गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. तर मुंबईसाठी २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. ९ एप्रिल मुंबईच्या लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. मुंबईच्या लोकसभेच्या ६ जागांसाठी तब्बल १५६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.


उत्तर पूर्वतून सर्वाधिक मतदार

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या जागेसाठी तब्बल ३३ जणांनी अर्ज भरले आहेत. तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर मुंबईत २२ जणांनी तर उत्तर पश्चिम मुंबईत २७, उत्तर मध्य मुंबईतून २७ आणि दक्षिण मुंबईतून १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपले अर्ज दाखल केले. १० एप्रिल रोजी या अर्जांची पडताळणी होणार असून १२ एप्रिल पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. मुंबई शहरासाठी ५२७ ठिकाणी २ हजार ६०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा -

उर्मिला मातोंडकरकडे ६९ कोटींची संपत्ती, इतर उमेदवारांच्या संपत्तीत 'इतकी' झाली वाढ

एक्झिट पोल्सवर बंदी, निवडणूक आयोगाचा माध्यमांना दणकासंबंधित विषय
ताज्या बातम्या