Advertisement

उर्मिला मातोंडकरकडे ६९ कोटींची संपत्ती, इतर उमेदवारांच्या संपत्तीत 'इतकी' झाली वाढ

काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, संजय निरुपम, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड तसंच शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांनी अर्ज भरले याचबरोबर भाजपाचे मनोज कोटक यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणूक अर्ज भरताना त्यांच्या सांपत्तिक स्थितीची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती दिली आहे.

उर्मिला मातोंडकरकडे ६९ कोटींची संपत्ती, इतर उमेदवारांच्या संपत्तीत 'इतकी' झाली वाढ
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी सोमवारी त्यांचे उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, संजय निरुपम, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड तसंच शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांनी अर्ज भरले याचबरोबर भाजपाचे मनोज कोटक यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणूक अर्ज भरताना त्यांच्या सांपत्तिक स्थितीची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती दिली आहे. 


उर्मिला मातोंडकर : 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसनं उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली असून त्यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला यांच शिक्षण एप्रिल १९९० मध्ये डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये एस. वाय. बीएपर्यंत झालं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकूण करपात्र उत्पन्न २ कोटी ८५ लाख ७० हजार ४४८ रुपये आहे. तसंच, पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात करंजा इथं ४.१७ एकर जमीन आणि आलेवाडी इथं ५.०९ एकर जमीन आहे. या दोन्ही जमिनींची किंमत १ कोटी ६८ लाख १९ हजार रुपये आहे. मर्सिडीज कार आणि अक्टिव्ह मॅग्ना अशा दोन मोटारी तिच्याकडं असून, त्यांची किंमत अनुक्रमे ६६ लाख ७४ हजार आणि ७ लाख २४ हजार रुपये आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आहेत. त्याचप्रमाणं उर्मिलाच्या नावावर ३२ लाख ६५ हजार ३०० रुपयांचं कर्ज आहे. 


अरविंद सावंत : 

शिवसेना -भाजप युतीचे दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत यांच्याकडं १९७९ मध्ये भाड्यानं घेतलेलं शिवडी इथं १८० चौरस फुटाचं घर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत १० गुंठे जागा असून ही जमीन १२ हजार रुपयांना घेतली आहे. तसंच या जमिनीची बाजारभावानुसार किंमत ३२ लाख किंमत आहे. सन २०१४ मध्ये त्यांची एकूण मालमत्ता १.८० कोटी होती, तर २०१९ मध्ये हीच मालमत्ता २.७१ कोटी झाली आहे. त्यांच्याकडं ६.५० लाखांची होंडा सिटी असून ५ लाख २८ हजार ५२३ किंमतीचं १९३ ग्रॅम वजनाचं सोनं आहे. त्याचप्रमाणं, पत्नीच्या नावे जंगम संपत्ती – एक कोटी ३८ लाख ९० हजार २२३, तर १२ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४६३ ग्रॅम वजनाचं सोनं आहे.


प्रिया दत्त : 

काँग्रेस नेत्या आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली असून त्यांच्याकडे १३ लाखांची रोकड रक्कम आहे. विविध व्यक्ती व संस्थांकडून त्यांनी ९५ लाखांचं कर्ज घेतलेलं आहे. दिवंगत वडील सुनील दत्त यांच्या मालकीच्या शेअरमध्ये एक तृतीयांश हिस्सा अशी १७ कोटी ८४ लाखांची मालमत्ता आहे. त्याचप्रमाणं विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये १२ खात्यात त्यांच्या ५७ लाख ६५ हजार ९६२ रुपयांच्या ठेवी असून, त्यांच्यावर ३ कोटी ३५ लाखांचं कर्ज आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात हमरापूर इथं ९.४ गुंठे जमीन आणि हरयाणात त्यांच्या नावे ६.२ एकर जमीन आहे. ३१ मार्च २०१८ अखेर दत्त यांचे १३ कोटी १३ लाखांचं करपात्र उत्पन्न आहे. तसंच, त्याच्याकडं असलेल्या मर्सिडीज बेन्झ आणि ह्युंदाई क्रेटा मोटारींची किंमत ३८ लाखांपर्यंत आहे.


राहुल शेवाळे : 

दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना-युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राहुल शेवाळे यांचं २०१८-१९ चं वार्षिक उत्पन्न ६ लाख ८२ हजार ४७६ रुपये आहे. तर, त्यांच्या पत्नीचे २०१८-१९ चे वार्षिक उत्पन्न ९ लाख ४६ हजार ११७ रुपये आहे. राहुल शेवाळे यांच्याकडं स्थावर मालमत्ता १ कोटी एक ३७ हजार रुपये आहे तर, पत्नीच्या नावे २१ लाख ४४ हजार ३१६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता साडे तीन लाख रुपयांची आहे. राहुल शेवाळे यांच्यावर ७७ लाख २९ हजार रुपयांचं, तर पत्नीच्या नावे ४९ हजार रुपयांचे बँकांचं कर्ज आहे. शेवाळे यांच्याकडे ३ लाख रुपयांचे, तर पत्नीकडे १५ लाख रुपयांचे दागिने आहेत. शेवाळे यांची शेअर्स आदी गुंतवणूक ४३ लाख रुपयांची आहे.


एकनाथ गायकवाड : 

एकनाथ गायकवाड यांचं २०१३-१४ चे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये होते. मात्र, आता २०१७-१८ चे वार्षिक उत्पन्न ७५ लाख १६ हजार रुपये आहे. तसंच, त्यांच्या पत्नीचं २०१७-१८ चं उत्पन्न ३ लाख २३ हजार रुपये आहे. गायकवाड यांच्याकडे रोख रक्कम ६० हजार रुपये आहे तर, पत्नीकडं १ लाख ५१ हजार रुपये आहे. गायकवाड यांच्या बँक खात्यात १९ लाख रुपये तर पत्नीच्या बँक खात्यात १० हजार रुपये आहेत. साताऱ्यातील कोंडवेमध्ये अडीच एकर जमीन आहे. तसंच, भिवंडी येथील दिवे येथे ६० हजार चौ. फूट व्यापारी जागा आहे.


मनोज कोटक : 

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, ते करोडपती उमेदवारांच्या यादीत येतात. कोटक यांच शिक्षण १०वी पर्यंत झालं आहे. या शिक्षणावर साडेपाच कोटींपर्यंत आपली सांपत्तिक स्थिती सुधारणाऱ्या कोटक यांच्याकडं गाडी नाही आहे. मनोज कोटक यांनी स्वत: पत्नी आणि मुलगा तसंच, एकत्र हिंदू कुटुंब अशी आपली सांपत्तिक स्थिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख ७ हजार रुपये आहे. मनोज कोटक यांच्यावर एक फौजदारी खटला आहे. एका खटल्यात कोटक यांना शिक्षा झालेली आहे. त्यांची स्थावर मालमत्ता १ कोटी ९७ लाख रुपयांची आहे. तर जंगम मालमत्ता ३ कोटी २९ लाख रु. एकूण मालमत्तेची किंमत ५ कोटी ४६ लाख रु. कर्ज व इतर आर्थिक दायित्व २० कोटी ४८ लाख रुपये आहे.


मिलिंद देवरा : 

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे १ कोटी ५९ लाख ९४ हजार रु. उत्पन्न आहे. तर त्यांच्या पत्नीचं उत्पन्न १५ लाख ३७ हजार रुपये आहे. देवरा यांच्याकडं १ लाख २७ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर पत्नीकडं ९ लाख ९२ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. देवरा यांची विविध बँकांमधील बचत १ कोटी ४ लाख ९१ हजार रुपये आहे. तसंच, पत्नीच्या बचत खात्यात १ कोटी १९ लाख ७२ हजार रुपये आहे. देवरांकडं २० कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी तर पत्नीच्या नावे १० कोटी एक लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

पोस्ट आणि विमा कंपन्यांमध्ये देवरांची १२ लाख ४७ हजार रुपयांची गुंतवणूक तर पत्नीच्या नावे ८४ लाख ८ हजार रुपयांची गुंतवणूक आहे. देवरांवर १० कोटी २३ लाख रुपयांचे तर पत्नीवर १८ कोटी ३ लाख रुपयांचे कर्ज आहे. देवरांकडं १९ लाख ८० हजार रुपयांची मोटार आहे. त्यांच्या पत्नीकडं १ कोटी ५० लाख रुपयांचे दागिने आहेत. देवरांकडं स्थावर मालमत्ता १ कोटी ८० लाख रुपयांची आहे, तर पत्नीची २९ हजार २२ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एकूण मालमत्तेची किंमत ३३ कोटी ७३ लाख ९४ हजार रुपये आहे.



हेही वाचा -

एक्झिट पोल्सवर बंदी, निवडणूक आयोगाचा माध्यमांना दणका

IRCTC उन्हाळ्यात पुरवते दररोज दीड लाख पाण्याच्या बाटल्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा