Advertisement

एक्झिट पोल्सवर बंदी, निवडणूक आयोगाचा माध्यमांना दणका

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे.

एक्झिट पोल्सवर बंदी, निवडणूक आयोगाचा माध्यमांना दणका
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. याशिवाय मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे ओपीनिअन पोल जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.


१९ मे पर्यंत बंदी

देशात सध्या लोकसभा निवडणुकांबरोबरच काही राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी म्हणजेच १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यम अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील एक्झिट पोल प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.


मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याआधी

तसंच संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तासांपूर्वी ओपिनिअन पोल किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असंही भारत निवडणूक आयोगामार्फत सांगण्यात आलं आहे.




हेही वाचा -

म्हणून करणार २० हजार ईव्हीएमची मोजणी !



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा