राधाकृष्ण विखेंचं सुजयच्या पावलावर पाऊल; हाती घेणार ‘कमळ’

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करून अहमदनगरची जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली होती. त्यानंतर आता सुजय यांचे वडील आणि काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे.

SHARE

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करून अहमदनगरची जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली होती. त्यानंतर आता सुजय यांचे वडील आणि काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांनी अधिकृतरित्या याची घोषणा केली नसली तरी १२ एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांना हजर राहून ते मार्गदर्शन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.


मोदींची नगरमध्ये सभा

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ एप्रिल रोजी नगरमध्ये येणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून त्याच्या नियोजनासाठी युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही सुरू आहेत. या बैठकांना राधाकृष्ण विखे हे देखील उपस्थित राहत असल्याचं दिसून आलं. तसंच मोदींच्या सभेत ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. असं झाल्यास काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मोहितेंचाही प्रवेश निश्चित

तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूजमध्ये १७ एप्रिल रोजी सभा होणार आहे. या सभेदरम्यान विजयसिंह मोहिते-पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. यापूर्वी विखे-पाटील यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान लवकरच मोठा निर्णय घेणार असून राजकीय भूकंप करणार असल्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा -

महाराष्ट्र द्वेषी निरूपमांचा प्रचार करणार नाही; मनसेची भूमिका

मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणातसंबंधित विषय
ताज्या बातम्या