Advertisement

जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपसातच भिडले

जळगावमधील अमळनेर येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडल्याच समोर येत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं

जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपसातच भिडले
SHARES

जळगावमधील अमळनेर येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडल्याच समोर येत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या सभेमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर माजी आमदार स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी माजी आमदार बी. एस. पाटील व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात शाब्दिक वाद झाला असून हाणामारी देखील झाली. त्यावेळी उदय वाघ यांनी व्यासपीठावर चढून बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याच समोर येत आहे.


हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी भरसभेमध्ये व्यासपीठावर आपापसात भिडलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. तसंच, वाद चिघळू नये यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा देखील प्रयत्न केला होता. दरम्यान या सर्व प्रकराचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे आमदार व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याच पाहायला मिळालं. परंतु, कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यानं त्यांच्यातील वाद आणखीनच चिघळल्याचं पाहायला मिळालं.



हेही वाचा -

पोलार्डच्या तुफानी खेळीमुळं मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा