पोलार्डच्या तुफानी खेळीमुळं मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय


SHARE

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात मुंबईनं ३ गडी राखून पंजाबचा पराभव केला आहे. पंजाबनं प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १९८ धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार पोलार्डनं ८३ धावांची धमाकेदार खेळी केली. तसंच, पोलार्ड बाद झाल्यावर शेवटच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मुंबईचा जलद गोलंदाज जोसेफ अल्झारी यानं २ धावा काडत मुंबई संघाला विजय मिळवून दिला आहे.


रोहित शर्माला विश्रांती

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली असल्यानं या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळं या सामन्यासाठी पोलार्डच्या हाती मुंबईच्या संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होत. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून पोलार्डन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांनविरुद्ध चांगली गोलंदाजी करता आली नाही. 


पंजाबच्या सलामीवीरांची दमदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात पंजाबचा सलामीवीर के.एल. राहुल यानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्यांदाच शतकी खेळी आहे. राहुलनं ६४ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकार मारत १०० धावा केल्या असून, शतकी खेळी करणारा लोकेश राहुल बाराव्या हंगामात तिसरा सलामीवीर ठरला आहे. त्याचप्रमाणं, ख्रिस गेलनं देखील चांगली फलंदाजी केली. त्यानं ३६ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकार मारत ६३ धावा केल्या. 


१९८ धावांचे आव्हान

या सामन्यात पंजाबनं १९८ धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात आक्रमक झाली, पण आश्वासक झाली नाही. दरम्यान, रोहित शर्माला दुखापत झाली असल्यामुळं त्याच्याजागी सिद्धेश लाड याला संधी देण्यात आली असून, त्याला मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणं, सिद्धेश लाड आणि डिकॉक यांनी चांगली सुरुवात करून दिली. परंतु, सिद्धेशला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर, सूर्यकुमार यादवनं काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली. मात्र, सूर्यकुमार यादव माघारी परतल्यानंतर कर्णधार पोलार्डन दमदार खेळी केली. पोलार्डनं ३१ चेंडूंत १० षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ८३ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळं सामना मुंबईच जिंकणार असं वाटत होतं. मात्र, पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस अल्झारी जोसेफ आणि राहुल चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या