Advertisement

झी वाहिनीचं प्रसारण २ तास बंद, निवडणूक आयोगाची कारवाई

मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवरील मालिकांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याप्रकरणी निवडणूत आयोगानं झी वाहिनीवर कारवाई केली. आचारसंहिता लागु असताना अशाप्रकारे प्रचार केल्यामुळं झी वाहिनीच्या कार्यक्रमांच प्रसारण ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आलं होतं.

झी वाहिनीचं प्रसारण २ तास बंद, निवडणूक आयोगाची कारवाई
SHARES

झी वाहिनीवरील मालिकांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याप्रकरणी निवडणूत आयोगानं झी वाहिनीवर कारवाई केली. आचारसंहिता लागू असताना अशाप्रकारे प्रचार केल्यामुळं झी वाहिनीच्या कार्यक्रमांच प्रसारण ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या मालिकांमधून पक्षांच्या कामांचा प्रचार करण्यात येत होता. त्यामुळं निवडणूक आयोगानं आपला आक्षेप नोंदवत कारवाई केली आहे.



राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्क

या प्रकरणी झी वाहिनीनं बाजू मांडत, ‘एक जबाबदार राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्क म्हणून झी टीव्हीनं कायमचं आपल्या कठोर साहित्य मार्गदर्शक तत्वांनुसार साहित्यनिर्मिती केली आहे. टेलिव्हिजनवर प्रसारित कार्यक्रमांमधील काही एपिसोड्समधील विशिष्ट शासकीय योजनांचा उल्लेख हा फक्त जनतेच्या हितासाठी कलात्मक दृष्टिकोनातून करण्यात आला होता', असं कंपनीचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.


आचारसंहिता भंगाची तक्रार

दरम्यान, 'भाभीजी घर पर है' आणि ‘तुझसे है राब्ता' या हिंदी मालिकांमधून भाजपनं आपल्या कामांचा प्रचार करत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी काँग्रेसतर्फे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयानं घेत कारवाई केली आहे.



हेही वाचा -

करून दाखवलं! शिवसेनेच्या नव्या लोगोतून 'भगवा' गायब

आरटीईअंतर्गत मुंबईतून ३,५३२ विद्यार्थ्यांना प्रवेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा