Advertisement

हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू

गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला हिमालय पूल दुर्घटनाग्रस्त झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू
SHARES

गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला हिमालय पूल दुर्घटनाग्रस्त झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७ झाली आहे.


उपचारादरम्यान मृत्यू

१४ मार्च या दिवशी सायंकाळी सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. यानंतर जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी येथील एमजीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नंदा कदम असं त्यांच नाव असून आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे.

कारवाई सुरू

पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित अहवाल सादर करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनीही त्वरित कारवाई करत डी. डी. देसाई कंपनीच्या नीरजकुमार याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी पोलिकेचा निलंबित सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते याला अटक केली होती.




हेही वाचा -

न्या. अभय ओक यांच्या नावाची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस

मुंबईतील ६ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा