Advertisement

घाटकोपर स्थानकातील २ पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

मध्य रेल्वेनं घाटकोपर स्थानकातील कल्याण दिशेकडील आणि सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पादचारी पूल १८ एप्रिल ते ४ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

घाटकोपर स्थानकातील २ पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद
SHARES

मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच आता, मध्य रेल्वेनं घाटकोपर स्थानकातील कल्याण दिशेकडील आणि सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पादचारी पूल १८ एप्रिल ते ४ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात नवीन पूल खुला करण्यात आल्यानं या स्थानकातील जीर्ण पूल पश्चिम रेल्वेनं १३ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दोन पूल बंद

सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनानं पुलांच्या दुरुस्तीची आणि पुनर्बांधणीची कामं तातडीनं हाती घेतली आहेत. घाटकोपर स्थानकात एकूण ३ पादचारी पूल आहेत. यामधील कल्याण दिशेकडील पुलाची उभारणी मध्य रेल्वेनं १९६७ साली केली होती. तसंच, सीएसएमटी दिशेकडील पुलाची उभारणी १९७० मध्ये करण्यात आली होती. या पुलांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वेतर्फे कल्याण दिशेकडील पुलाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरणाऱ्या पायऱ्या १८ एप्रिल ते ४ मेपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच, सीएसएमटी दिशेकडील पादचारी पुलाच्या पायऱ्या १७ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.


नवा पूल खुला

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकातील मुंबई रेल्वे विकास महामंडळानं उभारलेला पूल प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यामुळं नायगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील जुन्या पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेला उतरणाऱ्या पायऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं, नायगाव स्थानकासह नालासोपारा स्थानकातील विरार दिशेकडील जीर्ण झालेल्या पुलाच्या जागेवर नवा पादचारी पूल ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. नवा पादचारी पूल सुरू करण्यात आल्यानं प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील चर्चगेट दिशेकडील जुना पादचारी पुलाचा जिना १३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 


महत्वाचं स्थानक

घाटकोपर हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांपैकी महत्त्वाचं स्थानक आहे. या स्थानकावरून मेट्रोच्या दिशेनं प्रवासी जात असतात. त्यामुळं या २ पादचारी पुलांच्या जिन्यांचं काम सुरू झाल्यानंतर स्थानकांवर गर्दीचं प्रमाण वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 



हेही वाचा -

माहिममधून ३ कोटींचं विदेशी चलन जप्त

जेट एअरवेजच्या प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयनं रोखली उड्डाणं


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा