माहीममधून ३ कोटींचं परदेशी चलन जप्त

मुंबईतल्या माहीम परिसरात गुरूवारी ३ कोटींचे परदेशी चलन निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. टॅक्सीतून हे पैसे नेले जात होते.

माहीममधून ३ कोटींचं परदेशी चलन जप्त
SHARES

मुंबईतल्या माहीम परिसरात गुरूवारी ३ कोटींचे परदेशी चलन निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. टॅक्सीतून हे पैसे नेले जात होते. तोट्यात गेलेल्या एका विमान कंपनीचे हे पैसे असल्याचं म्हटलं जात आहे. 


बॅगेत परदेशी चलन

मुंबईच्या माहीम पोलिसांना परिसरात दोन जण परदेशी चलन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पैसे घेऊन जात असलेल्या टॅक्सीला ताब्यात घेतलं. त्यावेळी या टॅक्सीमधील दोघांजवळील बॅगेत परदेशी चलन आढळून आलं. 


नामांकित विमान कंपनीचे पैसे

याप्रकरणी चौकशी केली असता, हे चलन एका नामांकित विमान कंपनीचं असून सध्या कंपनी कर्जबाजारी झाल्यानं कंपनीतील नागरिकांचे पगार देण्यासाठी नेण्यात येत असल्याचे सांगितलं. याबाबतची माहिती माहीम पोलिसांनी माहीम विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी स्वाती कारले यांना दिली. या घटनेची वस्तुस्थिती पडताळण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही बोलवण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे.



हेही वाचा -

जेट एअरवेजच्या प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयनं रोखली उड्डाणं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा