मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं जोरदार आंदोलन

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून या कंपनीत काम करणाऱ्या २२ हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत पगार मिळण्यासह नोकरीबाबत कायम तोडगा काढण्याच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.  

जेटच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन १० मे पर्यंत तोडगा काढावा, नाहीतर आम्ही मुंबईतील दोन्ही विमानतळ बंद करू, त्याआधी ८ मेपासून आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा भारतीय कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी दिला होता. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे.


हेही वाचा- 

मुंबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या