मुंबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत

एअर फोर्सचं विमान विमान तांत्रिक बिघाडामुळे घसरल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. सकाळपर्यंत हे विमान धावपट्टीवरच उभं असल्याने ही धावपट्टी बंद ठेवावी लागली. त्यामुळे इतर विमानं कुर्ला-अंधेरी (१४-२२) या दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आली आहेत. ही धावपट्टी तुलनेने लहान असल्याने इतर विमानांच्या उड्डाणाला उशीर होत आहे.

SHARE

बंगळुरुच्या येलाहानाका एयर फोर्स स्टेशनवर जाण्यासाठी सज्ज असलेलं एएन ३२ हे विमान मंगळवारी रात्री ११.३२ च्या सुमारास धावपट्टीवरून घसरलं. विमानचालकाने प्रसंगावधान राखत हे विमान रोखल्याने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु सकाळपर्यंत हे विमान धावपट्टीवरून बाहेर काढण्यात आलं नव्हतं. त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे बुधवार पहाटेपासून तब्बल ५० विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं असून इतर विमानं ३० मिनिटे उशीराने मार्गस्थ होत आहेत. परिणामी विमान प्रवाशांना प्रचंड गैरसोईला तोंड द्यावं लागत आहे. 


दुसऱ्या धावपट्टीचा वापर

हे विमान तांत्रिक बिघाडामुळे घसरल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. सकाळपर्यंत हे विमान धावपट्टीवरच उभं असल्याने ही धावपट्टी बंद ठेवावी लागली. त्यामुळे इतर विमानं  कुर्ला-अंधेरी (१४-२२) या दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आली आहेत. ही धावपट्टी तुलनेने लहान असल्याने इतर विमानांच्या उड्डाणाला उशीर होत आहे.

 

प्रवाशांना मनस्ताप 

यामुळे मुंबई विमानतळावर विमान प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. विमान प्रवाशांना योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांच्या मनस्तापात भर पडत आहे. जेट एअरवेज बंद झाल्याने आधीच विमान प्रवासासाठी जास्त भाडं देणाऱ्या प्रवाशांना त्रासाला सामोरं जाव लागत आहे.

 


हेही वाचा-

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदी मंदावली

एसी लोकलची एप्रिलमध्ये १ कोटी ८३ लाख कोटींची कमाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या