एसी लोकलची एप्रिलमध्ये १ कोटी ८३ लाख कोटींची कमाई

मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळं रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलची वाट धरली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलनं एप्रिल महिन्यात चक्क पावणेदोन कोटींची कमाई केली आहे.

SHARE

मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळं रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलची वाट धरली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलनं एप्रिल महिन्यात चक्क पावणेदोन कोटींची कमाई केली आहे. २५ डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आल्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे दीड वर्षात तब्बल २३ कोटी ९२ लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत ५८ लाख ८४ हजार प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे.


अनेक उपाययोजना

पश्चिम रेल्वेवर मार्गावर २५ डिसेंबर २०१७ रोजी नाताळच्या मुहूर्तावर देशातील पहिली उपनगरीय वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकल सुरू झाल्यानंतर सुरवातील तिकीट दर जास्त असल्यामुळं प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्यानंतर या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला.


एसी लोकलची कमाई

कालावधीतिकिट प्रवासीउत्पन्न
२५ डिसेंबर १७ ते ३१ मार्च१८,८२,२३५७,२८,६२०३,१८,४०,६९२
एप्रिल १८ ते मार्च १९ ३,९७,८६६४७,०८,२८८१८,९०,३८,४५३
एप्रिल २०१९ ३९,६२२४,४७,५४०१,८३,६४,७८७
२५ डिसेंबर २०१७ ते ३० एप्रिल २०१९५,१९,७५८५८,८४,४४८२३,९२,४३,९३२


७ अतिरिक्त थांबे

एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं १ नोव्हेंबरपासून ७ अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड, नालासोपारा, नायगाव, दहिसर, चर्नी रोड, मरीन लाइन्स आणि ग्रँटरोड अशा थांब्यांमुळं एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. विरार ते चर्चगेट एकूण १२ फेऱ्यांपैकी फक्त दोनच फेऱ्या प्रत्यक्षात सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा गर्दीच्या वेळेत असूनही या एसी लोकलने आतापर्यंत सुमारे २४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसंच, एप्रिल महिन्यात १ कोटी ८३ लाख रुपयांची कमाई केली आहे.हेही वाचा -

एसटीच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी टोलफ्री क्रमांकसंबंधित विषय
ताज्या बातम्या