आता मराठीत मिळणार सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

‘शहाण्यानं कोर्टाची पायरी’ चढू नये असं म्हणतात. कारण कोर्टाच्या वाऱ्या एकदा सुरू झाल्या की त्या केव्हा थांबतील याचा काही नेम नसतो. शिवाय माणूस कितीही उच्च शिक्षित असो, त्याला कोर्टाचं कामकाज किंवा भाषा कळेलच, असंही नाही. हे लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने आता इंग्रजी व्यक्तीरिक्त हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये निकालपत्र उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार मराठीतही निकालपत्र उपलब्ध होईल.

प्रादेशिक भाषांनाही महत्त्व

आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर केवळ इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होतं. मात्र, हेच निकालपत्र आता मराठी हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.

अनेक वर्षांपासूची मागणी

बऱ्याच वर्षांपासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीत उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रं उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे.

महिनाअखेरपर्यंत सुरू

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत हिंदी आणि मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील. सुरुवातीला ५०० पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 


हेही वाचा-

मुंबईत गुरूवारी पुन्हा मुसळधार? हवामान खात्याचा इशारा

पावसाळ्यात मुंबई तुंबण्यास बीएमसीच जबाबदार, कॅगचा अहवाल


पुढील बातमी
इतर बातम्या