Advertisement

मुंबईत गुरूवारी पुन्हा मुसळधार? हवामान खात्याचा इशारा


मुंबईत गुरूवारी पुन्हा मुसळधार? हवामान खात्याचा इशारा
SHARES

मुंबईत गुरुवारी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. परंतु मागील २ दिवस पडलेल्या पावसाच्या तुलनेत या पावसाचा जोर कमी असेल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

शुक्रवारी दणक्यात सुरू झालेल्या पावसाने सोमवारी आणि मंगळवारी मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालं. जागोजागी पाणी साचल्याने मुंबईकरांना पाण्यातच दिवस काढावा लागला.


४०वर्षांचा विक्रम 

मुंबईत सोमवारी रात्री केवळ ४ ते ५ तासांत ३७५ ते ४०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.  मुंबईत याआधी असा तुफान पाऊस १९७४ मध्ये पडला होता.  त्यानंतर मुंबईत २००५ मध्ये ९४४.२ मिमी पाऊस पडला होता. गेल्या ४० वर्षातील  हा दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात दिली. 

एवढंच नाही, तर संपूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा पाऊस शुक्रवार ते सोमवार अशा ३  दिवसांत पडला.  २४ तासांत १५० मिमी पाऊस झाला तरच मुंबईतील पाणी पटकन ओसरतं. पण यापेक्षा जास्त पाऊस ५ ते ५ तासांत पडल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. 

मान्सून सक्रीय

बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी मान्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होईल, माहिती आयएमडीने दिली. हा पाऊस ८० ते १०० मिमी दरम्यान होईल. त्यानंतर पुढील २४ तासांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. सोबतच मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळतील, असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.हेही वाचा-

उशीरा सुचलं शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द, ठाण्यात चेंगराचेंगरीत २ महिला बेशुद्ध

पाण्यात गाडी अडकल्यावर काय कराल?
संबंधित विषय
Advertisement