उशीरा सुचलं शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द, ठाण्यात चेंगराचेंगरीत २ महिला बेशुद्ध


उशीरा सुचलं शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द, ठाण्यात चेंगराचेंगरीत २ महिला बेशुद्ध
SHARES

तब्बल १६ तासानंतर पूर्ववत झालेली मध्य रेल्वे रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने प्लॅटफाॅर्मवर भयंकर गर्दी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या लोकलही गर्दीने ओसंडून वाहत आहेत. त्यातच ठाणे स्थानकान २ महिला चेंगराचेंगरी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांचे हाल बघून मध्य रेल्वे प्रशासनाकडून रविवारचं वेळापत्रक रद्द करण्यात आलं आहे.

सोबतच काही अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत घाटकोपर स्थानकात २ तरुणी जखमी झाल्या आहेत. या महिलांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कळवा स्थानकात २ महिला लोकलमधून पडल्याची माहिती मिळत आहे. मुंब्रा कळवा दरम्यान ३ प्रवासी पडले, २ पुरुष तर एक महिला जख्मी, नाजिमा शेख असं महिलेचं नाव, तिघांवरही कळव्याच्या शिवाजी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु.

रविवारचं वेळापत्रक

मुंबईत सलग २ ते ३ दिवस कोसळणाऱ्या पावसाने ट्रॅकवरून घसरलेली लाेकल ट्रेनची सेवा अजूनही सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यातच बुधवार असूनही रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वे सेवा चालवत मध्य रेल्वेने प्रवाशांच्या हालात भर घातली आहे. परिणामी मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सर्वच महत्त्वांच्या स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळली आहे. या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत आहे.    

सोमवार आणि मंगळवारप्रमाणे बुधवारी देखील  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार असूनही रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक सुरू केल्याने सकाळी कामधंद्यावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लोकलविलंबाचा फटका बसायला सुरुवात झाली.  

प्लॅटफाॅर्मवर गर्दी

रविवारी प्रवाशांची संख्या कमी असूनही मर्यादीत लोकल ट्रेन असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यात बुधवार तर नेहमीचा धावपळीचा दिवस असल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर या स्थानकांसोबतच हार्बर रेल्वेवरील पनवेल, खारघर, बेलापूर वाशी, स्थानकांवरही प्रवासी खोळंबले आहेत.

बाळाला जन्म

डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलची वाट बघत असलेल्या जस्मीन शेख या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने डोंबिवलीत वनरुपी क्लिनीक मध्ये दाखल करण्यात आलं. तिथं या महिलेने बाळाला जन्म दिला.  

विशेष लोकल

लोकल स्थानकांवर उसळलेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी डोंबिवली आणि ठाण्याहून मुंबई सीएसएमटीसाठी विशेष लोकल सोडण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.हेही वाचा-

पावसाचे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी इथं क्लिक करा

रस्त्यांनीही धोका दिला, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांची ७ किमी रांगसंबंधित विषय