Advertisement

रस्त्यांनीही धोका दिला, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांची ७ किमी रांग

मुसळधार पावसाने ब्रेक घेतलेला असूनही मुंबईतील इस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. मुलुंड ते विक्रोळी दरम्यान वाहनांची ७ किलोमीटरपर्यंत रांग लागल्याने शेकडो प्रवासी वाहनांमध्ये अडकले आहेत.

रस्त्यांनीही धोका दिला, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांची ७ किमी रांग
SHARES

मुसळधार पावसाने ब्रेक घेतलेला असूनही मुंबईतील इस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. मुलुंड ते विक्रोळी दरम्यान वाहनांची ७ किलोमीटरपर्यंत रांग लागल्याने शेकडो प्रवासी वाहनांमध्ये अडकले आहेत. ऐन आॅफिस अवरच्या वेळेत ही वाहतूककोंडी झाल्याने नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रविवारचं वेळापत्रक

सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या धुवाँधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक अक्षरश: ठप्प झाली होती. मुंबईकरही आपापल्या घरांमध्ये अडकून पडले होते.

अनेक ट्रेन रद्द

बुधवारी पावसाने उघडीप घेतल्यावर मुंबईकर नेहमीप्रमाणे नोकरी- धंद्यासाठी घराबाहेर पडले खरे, परंतु मंगळवारी ट्रॅकवरून घसरलेली लोकल रेल्वे सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. बुधवार असूनही मध्य रेल्वे प्रशासन चक्क रविवारच्या वेळापत्रकानुसार सेवा चालवत आहे. असंख्य लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, कुर्ला, दादर, बेलापूर, वाशी अशा महत्त्वांच्या स्थानकांत प्रवशांची तोबा गर्दी उसळली आहे. त्यामुळे असंख्य मुंबईकरांनी रस्तेमार्गाची वाट धरली.

रस्त्यांवर वाहतूककोंडी

परिणामी रस्ते मार्गावरही मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे ऐवजी प्रवाशांनी ओला-उबरसारख्या खासगी सेवेसोबत रिक्षा, टॅक्सी आणि बसचा पर्याय निवडल्याने नेहमीच्या तुलनेत इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची संख्याही वाढली आहे. ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे ही वाहनं अत्यंत धिम्या गतीने पुढं सरकत आहेत. मुलुंड ते विक्रोळी तसंच विक्रोळी ते घाटकोपर या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.   



हेही वाचा-

पावसाचे लाइव्ह अपडेट्स वाचण्यासाठी इथं क्लिक करा

पाण्यात गाडी अडकल्यावर काय कराल?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा