Advertisement

पाण्यात गाडी अडकल्यावर काय कराल?

मालाड सब-वे इथं पाण्यात अडकलेल्या कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. समजा ही परिस्थिती तुमच्यावर देखील ओढवली तर? अशावेळी काय करायचं याच्या काही टिप्स...

पाण्यात गाडी अडकल्यावर काय कराल?
SHARES

मुसळधार पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपलं आहे. रस्ते अक्षरश: जलमय झाले आहेत. त्यात रस्ता खचणे, भिंत कोसळणे, विमान धावपट्टीवरून उतरणे अशा घटनांनी तर मुंबईकरांचं कंबरडं मोडलं. यात आणखीन एक घटना घडली ती म्हणजे मालाड सब-वे इथं पाण्यात अडकलेल्या कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.

नुकत्याच घडलेल्या या घटनेनंतर आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर साचलेल्या पाण्यात किंवा पूराच्या पाण्यात गाडी अडकल्यास काय करायला हवं याची माहिती असणं फार आवश्यक आहे. नाहीतर कारमध्ये गुदमरून किंवा बुडून मृत्यू होण्याची दाट शक्यता आसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. जर तुमच्यावर कधी गाडीमध्ये अडकण्याची वेळ आली तर या टिप्सचा नक्की विचार करा.

कार पाण्यात अडकल्यावर काय कराल?

  • तुमची कार कधी पाण्यात अडकली तर काचा बंद करुन कारमध्ये बसून राहू नका. आपण गाडी पार्क केली आहे. त्यामुळे आपल्याला काही धोका नाही असा गैरसमज करून घेऊ नका. बंद गाडीमध्ये कालांतरानं ऑक्सिजन कमी होण्यास सुरूवात होते. यामुळे तुमचा गुदमरून जीव जाण्याची भिती असते.
  • कारच्या दरवाज्यापर्यंत पाणी आल्यास कार पार्क करुन बाहेर पडा. कारमध्ये पाणी शिरल्यास शॉर्ट सर्किटचा धोका संभावतो. अशा वेळी गाडीतील सुरक्षा यंत्रणेत बिघाड होऊन तुम्ही कारमध्ये अडकू शकता.
  • तुमची कार पूर्णपणे पाण्याखाली जाण्याआधी तुम्हाला बाहेर पडणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला चपळाई दाखवत  कारची खिडकी पटकन उघडणं आवश्यक आहे. काच उघडताच खिडकिच्या बाजून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
  • कार पूर्णपणे पाण्यात बुडाली असेल तर प्रथम सीट बेल्ट काढा आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करा. दरवाजा उघडत नसेल तर दरवाज्या काचा फोडण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुमच्या कारमध्ये लहान हातोडी किंवा वजनदार वस्तू पाहिजेच. त्याच्या मदतीनं खिडकीची काच तोडून बाहेर पडू शकता.
  • कारची पुढील किंवा मागील काच भक्कम असते. त्यामुळे ती फोडण्याचा प्रयत्न करू नका. दरवाजाच्या काचा त्या तुलनेने फार भक्कम नसतात. त्यामुळे त्या हातोड्याच्या मदतीनं तोडता येऊ शकतात
  • कारची काच तोडताना ती वरच्या बाजूस तोडण्याचा प्रयत्न करावा. वरच्या बाजूस हातोडी किंवा एखाद्या वजनदार वस्तूचा वापर झाल्यास काच तुटण्यास वेळ लगात नाही.
  • पाण्यामध्ये कार अडकल्यानंतर जर एसी सुरू असेल तर एसी फ्रेशएअर मोडमध्ये ठेऊन कारच्या दरवाजाच्या काचा दोन इंच खाली घेतल्या पाहिजेत.

हेही वाचा

पोलिसांना करावी लागतेय तारेवरची कसरत, प्रशासन लक्ष देईल का ?

पावसावर राऊतांची कविता, मुंबईकर नाराज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा