Advertisement

पावसावर राऊतांची कविता, मुंबईकर नाराज

मुसळधार पावसामुळे एकिकडे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांना पावसावर कविता सुचत आहेत. पण त्यांच्या या कवितेवर मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पावसावर राऊतांची कविता, मुंबईकर नाराज
SHARES

मुसळधार पावसामुळे एकिकडे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात तसंच घरांमध्ये पाणी भरल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसामुळे सोमवारी मध्यरात्री मालाडमध्ये भिंत कोसळून अनेकांचा मृ्त्यू झाला. तर मंगळवारी सकाळी कल्याणमध्ये उर्दु शाळेची भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. मालाडमध्ये देखील पाण्यात अडकलेल्या कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. एकप्रकारे मुंबईवर आसमानी संकटच कोसळलं आहे

मुंबईत अशी परिस्थिती असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कविता सुचली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीटरवर पावसावर एक कविता लिहली आहे. पण त्यांची कविता नागरिकांच्या पसंतीस काही उतरलेली नाही. कवितेवर नेटकरांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

एकिकडे मुंबईची तुंबई झाली आहे. लोकांचा जीव चाललाय आणि त्यात तुम्हाला अशा कविता कशा काय सुचू शकतात? असा प्रश्न नेटकरांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी या ट्वीटवरून त्यांना ट्रोल केलं आहेसकाळचा नाष्टा जावेद अख्तर यांच्यासोबत केला काअसा खोचक प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय







हेही वाचा

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा

मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंची पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा