Advertisement

मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंची पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७५ जण जखमी झाले आहे. याबाबत भिंतीच्या आजूबाजूला पाणी साठल्यानं भिंत कोसळली असं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंची पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट
SHARES

मागील ५ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईसह इतर परिसरात प्रचंड पाणी तुंबलं आहे. या मुसळधार पावसामुळं अनेकांचे हाल होत आहेत. पावसामुळं मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७५ जण जखमी झाले आहे. याबाबत भिंतीच्या आजूबाजूला पाणी साठल्यानं भिंत कोसळली असं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं. 'गेल्या २४ तासात घडलेल्या या सर्व घटना गंभीर आहेत. तसंच, मुंबईत नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही, पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळं नाले दुथडी भरुन वाहत असून यामुळं मुंबई तुंबली' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिकेची पाठराखणही केली आहे.

सतर्क राहण्याचं आवाहन

मुंबईत साचलेल्या पाण्यामुळं झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला मंगळवारी भेट दिली. ३ ते ४ दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं पुढील काही दिवस मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय, आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसंच अनेक ठिकाणी पाणी उपसण्याचं प्रयत्न सुरु असून, नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही, पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. त्यामुळं नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईत गेल्या ४ दिवसात ३०० ते ४०० मिमी पाऊस झाला आहे', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पावसाचा जोर कायम

मुंबईत आजही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असून, सखल भागात पाणी तुंबलं आहे. त्यामुळं मुंबईत मध्य रेल्वे ठप्प झाली असून पश्चिम रेल्वे ही धिम्या गतीनं सुरु आह. मंगळवारी ११.५२ मिनिटांनी हायटाईड असल्यानं मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून शाळांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या २२ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

खोदकामं सुरु

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 'या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही. अशी कुठली यंत्रणा असेल तर तुम्हीच मला सांगा, आपण मुंबईत आणू. कलानगरला काही ठिकाणी खोदकामं सुरु आहेत. त्यामुळं कलानगर आणि मातोश्रीच्या आसपास पाणी तुंबलं. सगळेच मुंबईकर पावसात अडकले तसा मी ही अडकलो', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.



हेही वाचा -

भाजप-शिवसनेनं करून नाही, तर भरून दाखवलं- विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात हळुहळू वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा