Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात हळुहळू वाढ

जूनअखेरीस मुंबई दाखल झालेल्या मान्सूनमुळं तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार बँटिंग सुरू असून, मागील ३ दिवसांत ८ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात हळुहळू वाढ
SHARES

जुन महिन्याच्या सुरूवातील पुरेसा पाऊस न पडल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जूलैअखेर पर्यंतच पाणी पुरेल पाणीसाठा होता. त्यामुळं मुंबईकरांच्या पाणाच्या चिंतेत वाढ झाली होती. परंतु, जूनअखेरीस मुंबई दाखल झालेल्या मान्सूनमुळं तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार बँटिंग सुरू असून, मागील ३ दिवसांत ८ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.

१७ हजार दशलक्ष लीटर

रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत तलावांमध्ये १७ हजार दशलक्ष लीटरनं पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणं अपेक्षित आहे. मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत मुंबईला पुरेल, असा दावा पालिका प्रशासनानं केला. परंतु, पाऊस असाच पडला, तर या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१० टक्के पाणीकपात

मागील वर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळं तलाव क्षेत्रात ९१ टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळं १५ नोव्हेंबर पासून मुंबईत पालिकेनं १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, सलग ३ दिवस मुंबईबरोबरच ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस बरसत आहे. तसंच, तलावांमधील पाणीसाठ्यात हळुहळू वाढ होत असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

गरज असेल तरच घराबाहेर पडा- राज्य सरकारRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा