Advertisement

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू


कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू
SHARES

मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये नॅशनल उर्दू स्कूल या शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नॅशनल उर्दू स्कूलची भिंत शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळली. यामध्ये दोन महिला आणि एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर 16 वर्षीय मुलगी यामध्ये जखमी झाली आहे.  शोभा कांबळे (60), करीना मोहम्मद चंद (25) आणि हुसेन मोहम्मद चंद (3) अशी मृतांची नावे आहेत. 

रविवारपासून पडत असलेल्या पावसामुळे हाहाकार उडवला आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून 14 जणांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ आता कल्यामध्येही भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बचाव पथकानं  तिघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. यावेळी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. दुर्घटनेत आरती राजू कर्डिले (16)  ही मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा -

मालाडमध्ये भिंत कोसळून 14 जणांचा मृत्यूसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा