भाजप-शिवसनेनं करून नाही, तर भरून दाखवलं- विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे

महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र, तरीही मुंबईत पाणी साचल्यानं विरोधकांनी आता शिवसेना-भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

SHARE

मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल होत असून पावसाचं पाणी घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र, तरीही मुंबईत पाणी साचल्यानं विरोधकांनी आता शिवसेना-भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्याशिवाय, मुंबईतील परिस्थितीला महानगरपालिका जवाबदार असून, 'भाजप-शिवसनेने करून नाही, तर भरून दाखवलं' अशा शब्दांता विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानं हवामान विभागाकडून मुंबई येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंनी भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे. 'सत्तेत असलेल्या भाजप-सेनेचा दावा होता की, कितीही पाऊस झाला तरीही मुंबई ठप्प होऊ देणार नाहीत. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला आहे. तर 'भाजप-शिवसनेनं करून नाही, तर तुडुंब भरून दाखवलं' अशा शब्दांच  विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

इमारतींचं ऑडीट

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचं ऑडीट करण्याची मागणी आम्ही अनेकदा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळं मलाडसारख्या दुर्घटना होत असून याला फक्त महानगरपालिका जवाबदार असल्याचा आरोप दाखील धनंजय मुंडे यांनी केला आहे.हेही वाचा -

चांदीवलीत संघर्षनगरमध्ये रस्ता खचला, घरं खाली करण्याच्या सूचना

मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून उतरलं, अनेक विमानांचे मार्ग बदललेसंबंधित विषय
ताज्या बातम्या